esakal | "एटीएम'चा जांगडगुत्ता; रोखसाठी पायपीट
sakal

बोलून बातमी शोधा

"एटीएम'चा जांगडगुत्ता;  रोखसाठी पायपीट

"एटीएम'चा जांगडगुत्ता; रोखसाठी पायपीट

sakal_logo
By
प्रशांत राॅय
नागपूर : मन प्रसन्न करणारा आवाज कोणता तर एटीएममधून कोऱ्या करकरीत नोटा निघतानाचा खडखड, कर्र..कर्र...हा आवाज. यापुढे मात्र हा आवाज बंद होण्याची शक्‍यता आहे. हळूहळू देशातील एटीएम बंद पडत आहेत कारण ती कॅशलेश होत चालाली आहेत. जर तुम्ही बॅंकेतून रोख काढण्यासाठी एटीएमचा वारंवार वापर करत असाल तर लवकरच तुम्हाला एटीएमसाठी भरपूर पायपीट करावी लागणार, हे निश्‍चित. बॅंका आणि एटीएम सर्व्हिस प्रोव्हायडमधील वाद, गुंत्यामुळे एटीएमची संख्या रोडावणे सुरु झाले असून, या चक्रव्युहात नागरिक मात्र अडकले आहेत.
कधी अचानक पैशांची गरज असते. तेव्हा परिसरानजीक नजीकच्या एटीएमकडे पावले वळतात. मात्र, तेथे पैसे नसतात वा ते बंद पडलेले असते. जवळपासच्या ठिकाणी हीच स्थिती असते. यामुळे मनःस्ताप होतो. अशावेळी शिव्याशाप देत, चरफडत वेळ निभाऊन नेली जाते. परंतु, आपल्या लक्षात येत नाही की काही वर्षांपासून एटीएमची संख्या कमी करण्याची पावले उचलली जात आहेत. एटीएम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपग्रेड तसेच रोख व्यवस्थापन योजनांच्या मानकांनुसार देशातली एटीएम बंद पडू लागली आहेत. एटीएम उद्योगाची संस्था दी कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (सीएटीएमआय) ने हा इशारा आधीच दिला आहे.
बेरोजगारीचे संकट
कॅश लॉजिस्टिक आणि एटीएमच्या कॅसेट स्वॅप मेथडमध्ये बदल करण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. हजारो युवकांना एटीएममुळे रोजीरोटी मिळालेली आहे. एटीएम जर बंद पडले तर त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागू शकतो.
भरपाई न दिल्यास कंत्राट सरेंडर
सीएटीएमआयनुसार एटीएम चालवणे आर्थिक हिताचे नाही. पण एटीएमबंद झाल्यास नोटाबंदीसारखं वातावरण तयार होऊ शकतं. एटीएम कंपन्यांना नोटाबंदीत आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. विविध संस्थांच्या माहितीनुसार एटीएम ऑपरेटर्स आधीच तोट्यात आहे. यापुढे ते अतिरिक्त तोटा उचलू शकत नाहीत. जर बॅंकेने त्यांना भरपाई दिली नाही तर मोठ्या प्रमाणावर एटीएम कंत्राट सरेंडर होतील. परिणामी एटीएम बंद पडतील, असे मानले जाते.
यामुळे एटीएम होणार बाधित
- हार्डवेअर, सॉफ्टवेअरसंबंधीचे निर्देश
- रोख रकमेच्या व्यवस्थापनाच्या नव्या अटी
- कॅश लोडिंग कॅसेट स्वॅप करण्याची पद्धत
परिणाम कोणावर?
ग्रामीण भागात राहणारे बहुसंख्या नागरिक जे सामाजिक, शैक्षणिक व आर्थीकदृष्ट्या पहिल्याच पायरीवर आहेत त्यांच्यावर शहरी ग्राहकांच्या तुलनेत प्रतिकुल परिणाम होण्याची शक्‍यता अनेक जाणकार व्यक्त करीत आहेत.

वर्षनिहाय एटीएमची संख्या
संख्या---222300---221703
वर्ष---डिसेंबर 2017---मार्च 2019
(स्त्रोत ः आरबीआय)

अशी आहेत कारणे
-वाढत्या खर्चावर लगाम
-डिजिटल व्यवहारात वाढ
-मोबाईलच्या वापराकडे कल

एटीएम सर्व्हिस प्रोव्हायडच्या अडचणी
- संपत्ती 100 कोटी असणे आवश्‍यक
- किमान 300 वाहनांचा ताफा गरजेचा
- व्हॅनमध्ये दोन बंदुकधारी, दोन संरक्षकासह ड्रायव्हर

 
loading image
go to top