Crime News: धक्कादायक! घरातील गुप्तधन शोधण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

मुलगा सुखरूप मांत्रिक व महिलेसह सहा जणांना अटक
Crime News
Crime NewsEsakal

नांदगावपेठच्या टाकळी जहाँगीर गावात घरातील गुप्तधन शोधण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. महिलेसह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली. बुधवारी (ता. ११) रात्री अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. (Latest Marathi News)

सुखदेव वासुदेव पटोरकर (वय ४०, रा. भांडूम, चिखलदरा), रामकिशोर सोनाजी अखंडे (२३, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), संजय हरिदास बारगंडे (वय ३५), सचिन बाबाराव बोबडे (५०, दोघेही रा. कुंभी, गौरखेडा), मुक्ता दिवाकर बाभळे (वय ६४, रा. टाकळी जहाँगीर) व रवी शालिकराव धिकार, अशी अटक सहा आरोपींची नावे असल्याचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे व नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यावेळी उपस्थित होते.

Crime News
Hunger Index: जागतिक भूक निर्देशांकात भारताची 111व्या क्रमांकावर घसरण; पाकिस्तानपेक्षाही भारताची स्थिती वाईट

यासंदर्भात टाकळी जहाँगीर येथील गावकऱ्याने नांदगावपेठ ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी नमुद सहाही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सचिन बोबडे व मुक्ता बाभळे हे नातेवाईक आहेत. घरात गुप्तधन असून ते शोधण्यासाठी पायाळू मुलाला आणून पूजाविधी करावा लागेल, अशी माहिती सचिनने मुक्ता यांना दिली होती. त्या आमिषाला बळी पडून मुक्ता बाभळे हिने टाकळी जहाँगीर येथील तिच्या घरात रात्री पूजाविधी करण्याचे ठरविले. त्यासाठी सुखदेव पटोरकर या मांत्रिकाला बोलवण्यात आले. (Marathi Tajya Batmya)

Crime News
Uddhav Thackeray : सुनील तटकरेंचा खळबळजनक दावा ; म्हणाले ठाकरेंची भाजप सोबत... !

दरम्यान, एका ग्रामस्थाला गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी दिल्या जात असल्याचा संशय आला. त्याने घरात सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, संजय खारोडे, प्रवीण नवलकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू काळे, पंकज यादव, संजय इंगोले यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर टाकळी जहाँगीर येथील मुक्ता बाभळे हिच्या घराची झडती घेतली.

त्याठिकाणी एक अल्पवयीन मुलाला (वय १२) सोबत घेऊन मांत्रिक मंत्र म्हणत गुप्तधनाची जागा त्याला सतत विचारताना आढळून आला. पोलिस येताच मांत्रिक सुखदेव पटोरकर हा घरातील बाथरूममध्ये लपला, तर इतर पळून गेले. सुखदेवला अटक केल्यानंतर उर्वरित लोकही पोलिसांच्या हाती लागले.(Latest Maharashtra News)

Crime News
Tanushree Dutta: तनुश्री दत्ताने राखी सावंत विरुद्ध नोंदवला FIR, नाना पाटेकरांवरही टिका करत म्हणाली, "समाजसेवा करुन त्यांनी..."

मुलगा शालेय गणवेशात

ज्या पायाळू मुलाला गुप्तधन शोधण्याकरिता पूजा करताना बोलविले होते. तो शाळेच्या गणवेशात होता. त्याला नमूद मांत्रिक व त्याच्या साथीदारांनी मल्हारा, परतवाडा येथून सोबत आणले होते, अशी कबुली चौकशीअंती आरोपींनी दिली.

पूजासाहित्य जप्त

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा तेथे पूजेसाठीची हळद, कुंकू व अन्य पूजा साहित्य दिसून आले. तसेच, राख, लोखंडी सब्बल, चटई तेथे होती व तेथेही दिवा लावलेला होता. हे साहित्य पोलिसांनी तपासाअंती जप्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com