औषधांच्या चिठ्ठ्यांचे होणार ऑडिट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

नागपूर : राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांसह इतरही सरकारी रुग्णालयात डॉक्‍टरांकडून रुग्णांना प्रीस्क्रिप्शन दिले जाते. त्या प्रीस्क्रिप्शनवर मोठ्या प्रमाणात "अँटिबायोटिक्‍स' लिहून दिले जात असल्याची बाब समोर आली. यामुळे या प्रतिजैविकांच्या अतिवापराला आळा घालण्यासाठी प्रीस्क्रिप्शन अर्थात औषधांच्या चिठ्ठ्यांचे ऑडिट करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य संचालनालयाने घेतला आहे. 

जिल्हा रुग्णालय असो की, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय डॉक्‍टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय रुग्णांना काही औषधं देता येत नाहीत. मात्र, आता डॉक्‍टरांच्या प्रीस्क्रिप्शनचंही ऑडिट होईल, असे शासनाच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले. रुग्णालयात उपचारासाठी आलेला रुग्ण बरा व्हावा, हे प्रत्येक डॉक्‍टरला वाटते. मात्र, लवकर बरा व्हावा ये हेतूने रुग्णांना अँटिबायोटिक्‍सचा डोस लिहून दिला जातो. यामुळे अँटिबायोटिक्‍सच्या अतिवापर झाल्यास काही विषाणू औषधांना दाद देत नाही. हा धोका लक्षात घेत आरोग्य संचालनालयाने सर्व शासकीय तसेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्‍टरांकडून लिहून दिलेल्या औषधांच्या चिठ्ठ्यांचे ऑडिट करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व सरकारी आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य प्रमाणात आणि आवश्‍यक ती औषधी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित औषधालयात औषधं असतात. ही औषधी रुग्णांना उपलब्ध करून द्यावी. तसेच गरज नसताना डॉक्‍टरांनी अँटिबायोटिक्‍स आपल्या प्रीस्क्रिप्शनवर लिहू नये असे आदेश डॉक्‍टरांना या परिपत्रकातून देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे. लवकरच औषधांची चिठ्ठी तपासणीच्या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: audit of drugs prescription