esakal | तुमचा विश्‍वास बसेल का? आईचे दूध पिल्याने बाळाचा मृत्यू, काय असेल कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Baby dies after drinking breast milk in Amravati

तुमचा विश्‍वास बसेल का? आईचे दूध पिल्याने बाळाचा मृत्यू, काय असेल कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : प्रिया व कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला... घर तसे आर्थिक संपन्न असल्याने कोणत्याही गोष्टीची कमी नाही... सुखी संसार सुरू होता... पती-पत्नी यांच्या नात्यातही गोडवा कायम होता... त्याच्या आनंदी जीवनात एका नव्या पाहुण्याचे आगमण झाले. यामुळे सुखी संसार आणखीनच फुलला... मात्र, त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली... शनिवारी प्रियाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिची प्रकृती गंभीर असून, बाळाचा मृत्यू झाला. कुंज असे मृत बाळाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया येवले (वय 23, रा. धनेगाव, ता. अंजनगावसुज) असे विष पिणाऱ्या आईचे नाव आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिचा कुलदीप येवले यांच्याशी विवाह झाला होता. दोघांचा सुखी संसार सुरू होता. कुलदीप येवले यांच्याकडे संत्राबाग असून, आर्थिक संपन्नता आहे. यामुळे घरात कुठल्याही गोष्टीची कमी नाही. अशातच दोघांना मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव कुंज ठेवले. पाहता-पाहता कुंज अकरा महिन्यांचा झाला. कुंजमुळे प्रिया आणि कुलदीप यांच्या जीवनात आनंद आणखीनच वाढला होता. 

सविस्तर वाचा - तू दुसऱ्याशी लग्न करू नको; माझ्याशी संबंध ठेव, तुझा व मुलीचा पूर्ण खर्च उचलतो

मात्र, शनिवार (ता. 22) त्यांच्या सुखी आयुष्या ग्रहण लावून गेले. प्रियाने शनिवारी दुपारी अज्ञात कारणावरून विष प्राशन केले. विष पिल्यानंतर तिने कुंजलाही दूध पाजले. केवळ अकरा महिन्यांच्या कुंजवर तत्काळ विषाचा परिणाम झाला. ही बाब घरातील लोकांना समजताच धावाधाव झाली. त्यांनी तत्काळ प्रिया व बाळाला परतवाडा येथील रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कुंजचा मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूप्रकरणाची नोंद घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

प्रियाची प्रकृती चिंताजनक

सुखी संसार सुरू असतानाच प्रियाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने मुलाला दूध पाजल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रियाची प्रकृती चिंताजनक असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते. मुलाचा मृत्यू आणि आईची प्रकृती चिंताजनक असल्याने धनेगावात शोककळा पसरली आहे.

हे कसं शक्य आहे? - Video : बॉक्‍सर मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी वाजवला 'डीजे', हे आहे कारण...

कारण अद्याप अस्पष्ट

प्रियाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. परंतु, प्रियाने विष का प्राशन केले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घरच्यांनाही याबाबत काहीही माहिती नाही. प्रिया असे काही करेल, याचा त्यांनी विचारही केला नव्हता.