esakal | ...तर चार दिवसांचा आठवडा करून टाका, असे का म्हणाले राज्यमंत्री बच्चू कडू?
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu kadu

...तर चार दिवसांचा आठवडा करून टाका, असे का म्हणाले राज्यमंत्री बच्चू कडू?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना आता शनिवार-रविवार सुट्टी असणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (ता. १२) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा असेल. अनेक दिवस प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमवबजावणी करण्यात येईल.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून पगार देण्यात यावा
मागील अनेक वर्ष राज्य सरकारचे कर्मचारी प्रतिनीधी पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, काही ना काही अडचणींमुळे हा निर्णय होऊ शकला नव्हता. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.  

या निर्णयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारी कर्मचार्यांना पाच दिवसांचा आठवडा असेल तर मग पगार सात दिवसांचा कशाला ? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे.


तुमच्यासाठी नाही बरं का पाच दिवसांचा आठवडा... वाचा -


सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून करून पगार देण्यात यावा, तसेच पदानुसार पगार देण्यापेक्षा कामानुसार पगार देण्यात यावा असेही ते म्हणाले. एवढेच नाही तर जे अधिकारी इमानेइतबारे काम करतात त्यांना चार दिवसांचा आठवडा केला तरी हरकत नाही. सर्वांच्या कामाचे मूल्यमापन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.