वाचलो बाप्पा, नाही तं गेला होता जीव ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पारशिवनी (जि.नागपूर): गेल्या अनेक दिवसांपासून येथील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंतचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. यावरून अनेक वाद निर्माण झालेले आहेत. कंपनी प्रशासन नागरिकांना विनाकारण त्रास देत असून काम करीत असताना कुठलीही सुरक्षा व्यवस्था बाळगण्यात येत नाही. याचमुळे रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान ट्रकच्या धक्‍क्‍याने वीजतारा कोसळून परिसरात आगीचा भडका उडाला. सुदैवाने मध्ये कोणी न आल्याने संकट टळले. 

शिवाजी चौकात सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. कंपनीचा सिमेंट मिक्‍चर भरलेला ट्रक मागे येत असताना मागे असलेल्या खांबाला जाऊन धडकला. खांब तुटल्याने येथील जिवंत विद्युत तारा तुटून जमिनीवर आदळल्या. सुदैवाने त्यावेळी जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या अंगावर विद्युत तारा कोसळल्या नाहीत. या तारा नागरिकांच्या अंगावर पडल्या असत्या तर मोठी दुघर्टना घडली असती. छोटी दुकानेही या तारांच्या बाजूलाच असल्याने तीसुद्धा बचावली. अन्यथा दुकानासह दुकानमालकांना जिवंत समाधी मिळाली असती. याबाबत लागलीच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच संपूर्ण शहराची वीज काही वेळासाठी बंद करून येथील तारा हटविण्यात आल्या. या रस्त्याचे काम करीत असताना नागरिकांना जाण्या-येण्यासाठी "अप्रोच' रस्ताही तयार न करता येथील नागरिक चिखलातून, खडकाळ रस्त्यातून कसेबसे मार्ग काढून आवागमन करीत आहेत. प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असूनदेखील सुधारणा केली जात नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bachalo Bapu, no you had gone for life!