
तिवसा : शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहे. सोमवारी (ता. १९) गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर शिक्षकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत शासनाच्या आदेशाची होळी केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.