
यवतमाळ : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि दिव्यांगांना न्याय द्यावा, या मागणीसाठी बच्चू कडू यांच्यासह शेकडो शेतकरी, दिव्यांगांनी पदयात्रा काढली आहे. दरम्यान, रविवारी (ता. १३) महागाव तालुक्यातील काळी दौ. येथून यात्रा निघाली असता, बच्चू कडू यांनी चक्क डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती. यावेळी पदयात्रेत दिव्यांगसुद्धा सहभागी झाले होते.