
महाराष्ट्रातील शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे, तर दिव्यांगांच्या मानधन वाढीसंदर्भात ३० जून रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती देताना सरकार शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. या घोषणेनंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.