
तिवसा : शेतकरी शेतमजूर व दिव्यांग, निराधार यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे शासन लक्ष देत नसल्याचा आरोप करित प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळाचे दर्शन घेऊन ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.