Bageshwar Dham Head Dhirendra Shastri : बागेश्वरधाम पिठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी शेगावच्या श्री संत गजानन महाराज देवस्थानचे कार्य अप्रतिम व अलौकिक असल्याचे सांगितले. स्वच्छता आणि सामाजिक उपक्रमांची प्रशंसा केली.
शेगाव : येथील श्री संत गजानन महाराज देवस्थानचा देशपातळीवर नावलौकिक आहे. संस्थांनचे कार्य अप्रतिम व अलौकिक आहे. याठिकाणी असणारी परिसर स्वच्छता वाखाणण्याजोगी असून संस्थानचा पारदर्शक कारभार, राबविण्यात येत असलेले सेवाभावी उपक्रम समाज उपयोगी आहे.