
चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण करण्याप्रकरणात सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे नेते बळीराज धोटे यांना न्यायालयाने सोमवारी (ता. 26) जामीन मंजूर केला. मात्र, सुटकेची वेळ संपल्याने त्यांना आजची रात्री तुरुंगातच घालवावी लागणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्यावरील आक्षेपार्ह मजकुराबाबत त्यांच्यावर रविवारला रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत उद्या ते अंतरिम जामीनासाठी न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
धोटे यांनी भगतसिंग यांच्याविरोधात इंग्रजांच्या बाजूने सूर्यनारायण शर्मा यांनी खटला लढला. शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते, अशा आशयाचा मजुकर समाजमाध्यमांवर टाकला होता. याची तक्रार भाजपच्या मीडिया सेलने केली. त्यानंतर त्यांच्यावर भादंवी 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना रविवारला पहाटे चार वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांना आज जामीन मंजूर झाला. परंतु वेळ संपल्याने तुरुंगातून त्यांची मंगळवार (ता. 27) सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालच रात्री उशिरा चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह मजकुराचा आधार घेत शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कलम 354 अ (1) (4) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना संघाविषयी लिखाणासंदर्भात जामीन मिळाला. मात्र, दुसऱ्या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
महापौरांसह 32 जणांवर गुन्हा
बळीराज धोटे यांच्या पुतळ्याचे दहन करण्याप्रकरणात आंदोलकांवर गुन्हे दाखल करावे, असे निवेदन अशोक मेश्राम आणि इतरांनी दिले होते. शहर पोलिस ठाण्यात महापौर अंजली घोटेकर, नगरसेवक छबू वैरागडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वनिता कानडे यांच्यासह इतर 30 जणांवर भादंवी 135 अन्वये गुन्हा दाखल केला.
धोटेवरींल कार्यवाईचा निषेध
बळीराज धोटे यांच्यावरील कारवाई राजकीय दबावातून करण्यात आली. अटक अन्यायकारक आहे. याचा निषेध करणारे निवेदन विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यात संभाजी ब्रिगेड, सत्यशोधक समाज, बामसेफ, भारत मिशन सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, प्रबोधन विचार मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, कॉन्स्टीट्युशनल एजिटेशन फोरम, बहुजन एम्प्लाईज फेडरेशन, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, आम आदमी पार्टी, भूमिपूत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, बीआरएसपी, वंचित बहुजन आघाडी, मनसे, जिजाऊ रमाई संघटना, समता सैनिक दल, सेवादल, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटना, धनोजे कुणबी संघटना, सोशॅलिस्ट पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी आदींचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.