Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

अंदुरा पानखास पुलाजवळ एसटी-दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, रस्त्यावरील भेगांमुळे अपघात झाल्याचा आरोप
Infrastructure Failure: The Role of Road Conditions

Infrastructure Failure: The Role of Road Conditions

Sakal

Updated on

बाळापूर : शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन अकोटच्या दिशेने परतणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीची एसटी बसशी समोरासमोर भीषण धडक झाली. अंदुराजवळील पानखास पुलानजीक रविवारी (ता. २१) दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील मोठ्या भेगांमुळे दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्रीकांत पुरुषोत्तम बायस्कार (वय २५) आणि कुणाल राजू भोरे (वय २४, दोघेही रा. गजानन महाराज नगर, अकोट) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com