DroughtCrisis: दुष्काळामुळे शेतमजुरांच्या हाताला काम मिळेना; घरात दाणा नाही; शेतमजुरांवर उपासमारीचे संकट, सरकारकडून मदतीची अपेक्षा

Rural Employment Crisis : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात दुष्काळामुळे शेतीची कामे घटली असून शेतमजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. रोजंदारीवर अवलंबून असलेल्या भूमिहीन कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, रोजगार हमीच्या कामांना गती देण्याची मागणी होत आहे.
Farm labourers in Balapur face a shortage of agricultural work as drought conditions affect farming activities.

Farm labourers in Balapur face a shortage of agricultural work as drought conditions affect farming activities.

esakal

Updated on: 

संतोष काळे

वाडेगाव: बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने शेतीच्या अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी पिके करपल्याने शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्च निघेल एवढेही उत्पन्न आलेले नाही. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून, त्याचा थेट परिणाम शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या शेतमजुरांवर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com