पिझ्झा, बर्गर खाऊ नका, नाही तर...

संजय डाफ 
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

यासंदर्भात सर्व महाविद्यालयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळं यापुढं आता महाविद्यालयांच्या कॅटींग मध्ये फक्‍त 'हेल्दी फुड' ठेवले जाणार आहे. नागपूर शहरातील 68 तर, विभागातील 265 महाविद्यालयांना याबाबत अन्न विभागानं पत्र पाठवलं आहे. 

नागपूर : पिझ्झा, बर्गरल खाल्ल्याशिवाय तरुणाईला दिवस घालवणं केवळ अशक्य. अशा काळात नागपूरच्या महाविद्यालयांमध्ये पिझ्झा, बर्गरला बंदी घालण्यात आली आहे. महाविद्यालयांतील कॅंटिनमध्ये पिझ्झा आणि बर्गरच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असून, या 'जंक फुड'मुळं युवकांच्या आरोग्यावर दुष्पपरिणाम होत असल्याचं कारण अन्न आणि औषधी प्रशासनानं दिलं आहे.

यासंदर्भात सर्व महाविद्यालयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळं यापुढं आता महाविद्यालयांच्या कॅटींग मध्ये फक्‍त 'हेल्दी फुड' ठेवले जाणार आहे. नागपूर शहरातील 68 तर, विभागातील 265 महाविद्यालयांना याबाबत अन्न विभागानं पत्र पाठवलं आहे. 
विशेष म्हणजे या निर्णयाचं विद्यार्थ्यांनीही केलं आहे. कॅन्टीनमध्ये पिझ्झा, बर्गर मिळत असल्यानं ते खावंच लागायचं. आता ते मिळणार नसल्यानं हेल्दी फुड खरेदी करून खाऊ, त्यामुळं आमचंही आरोग्य चांगलं राहील, अशा प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

दुसरीकडं महाविद्यालयांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. विद्यार्थ्यांची मागणी असल्यानं कॅन्टीनमध्ये हे पदार्थ मिळायचे. मात्र, आता बंदी घालण्यात आल्यानं हे पदार्थ ठेवणार नसल्याचं महाविद्यालय प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

तरुण पिढीत पिझ्झा आणि बर्गरची मोठी क्रेझ आहे. विद्यार्थी या चटपटीत पदार्थांच्या आहारी गेलेत. यामुळंच त्यांच्याभोवती लठ्ठपणा आणि इतर आजारांचा विळखा घट्ट होतो आहे. त्यामुळं अन्न व औषधी प्रशासनानं घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी महाविद्यातील कॅन्टीनमध्ये मिळत नाही म्हटल्यावर हे पदार्थ बाहेर हॉटेलमध्ये खायला जाऊ नये म्हणजे झालं! अशा प्रतिक्रिया काही प्राध्यापकांनी व्यक्त केल्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ban on pizza, buger in Nagpur collage