...आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी फेकली शेतकऱ्यांची कर्जासाठीची कागदपत्रे!

bank
bank

तिवसा (जि अमरावती) :  तिवसा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कृषीकर्ज विभागातील राजेश्वरी देशमुख या महिला अधिकारी तथा कर्ज विभागातील सहाय्यक अधिकारी बॅनर्जी यांनी बँकेअंतर्गत येणारे पीककर्ज व योजनेच्या कागदपत्रांची माहिती देण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यांना अपमानजनक वागणूक दिल्याचा प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर वायरल केला आहे.

कर्ज वितरण प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये अशा शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना आहेत.

तरीही एस.बी.आय तिवसा शाखेचे अधिकारी शेतकऱ्यांना,वयोवृद्ध पेन्शन धारकांना कर्ज प्रकरणे दाखल करण्यासाठी बँकेत आले असता अक्षरशः हाकलून लावतात, ,पोलिसांच्या धमक्या देतात ,उद्धट बोलून शेकडो शेतकऱ्यांच्या अंगावर त्रुटी असल्यास कागदपत्रे फेकून देतात अशा घटना गेल्या महिन्यापासून नित्याच्या झाल्याचा आरोप तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष वैभव वानखडे व काही शेतकऱ्यांनी केला आहे.

हवालदिल शेतकरी कर्ज गरजेचे असल्याने त्यांचे निमूट ऐकून घेत होते, शेवटी बँकेत एकाच कामासाठी अनेक वेळा चकरा मारायला लावल्याने काही शेतकरी संतप्त झाले होते, याबद्दल प्रचंड रोष व तक्रारी बघता शाखा व्यवस्थापक दिनेश राव यांच्याशी चर्चा करण्यास व शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी नगराध्यक्ष वैभव वानखडे हे शेतकरी व युवक काँग्रेसच्या मंडळीसह बँकेत पोहचले असता हा प्रकार सुरूच होता, बँकेची वेळ संपली नसताना रांगेत लागलेल्या शेतकऱ्यांना सदर महिला अधिकारी हाकलून लावत होती यावर नगराध्यक्ष व युवक काँग्रेसने आक्षेप घेत या अधिकारी मंडळीना जाब विचारला व शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी समज दिली यावेळी याठिकाणी तणाव निर्माण झाला होता, शिष्टमंडळाने बँक व्यवस्थापकांना अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली यासोबतच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात माहिती दिली असता त्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देत जिल्हाधिकारी व एसीबीआय क्षेत्रीय प्रबंधक यांना यासंदर्भात कडक कारवाई करून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही व कर्जप्रकरणे तातडीने मंजूर होईल यासाठी सूचना केल्या आहेत.

कठोर कारवाई झाली पाहिजे
तिवसा शहरातील राष्ट्रीयकृत बँकेत काही अधिकारी कोरोना काळात बाहेरगावावरुन तर येतातच सोबत खातेदारांना व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन न करता उद्धट वागणूक देत कृषि कर्ज प्रकरणास विलंब लावतात अशा मुजोर अधिकाऱ्यावर शासनाचा चाप बसलाच पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे
वैभव वानखडे, नगराध्यक्ष तिवसा

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com