'फादर्स डे'च्याच दिवशी बापलेकाचा मृत्यू!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

सर्वत्र ‘फादर्स डे’साजरा होत असताना घाटंजी येथील वाघाडी नदीत  बुडून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (ता. २१) दुपारी दोनदरम्यान  घडली. दरम्यान, "फादर्स डे'च्या दिवशी घडलेल्या घटनेने घाटंजी तालुक्‍यात हळहळ व्यक्त  होत आहे.

घाटंजी, (यवतमाळ) : सर्वत्र ‘फादर्स डे’साजरा होत असताना घाटंजी येथील वाघाडी नदीत  बुडून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (ता. २१) दुपारी दोनदरम्यान  घडली. दरम्यान, "फादर्स डे'च्या दिवशी घडलेल्या घटनेने घाटंजी तालुक्‍यात हळहळ व्यक्त  होत आहे. संजय शिवप्रसाद अग्रहारी (वय ४२) व मुलगा आदित्य संजय अग्रहारी (वय १३,  रा. शिवाजी चौक) अशी मृतांची नावे आहेत.

रविवारी संजय अग्रहारी यांचे कुटुंब व सुभाष सायरे यांचे कुटुंब सूर्यग्रहण असल्याने विधी  करण्याकरिता वाघाडी नदीपात्राजवळ गेले होते. दोन्ही कुटुंबांची पूजा झाल्यावर अंघोळ  करताना सुभाष साय, संजय अग्रहारी व त्यांचा मुलगा आदित्य अग्रहारी व एक लहान  मुलगा असे एकूण चार जण पाण्यात बुडत असतानाचे पाहून सोबत असणाऱ्या महिलांनी  व पुजाऱ्याने आरडाओरडा केली.

त्यावेळी येथील भोयर यांना ही आरडाओरड ऐकू  आल्यानंतर त्यांनी नदीपात्रात उडी घेऊन सुभाष सायरे व एका लहान मुलाला वाचविण्यात  यशस्वी मिळविले. मात्र, तोपर्यंत संजय अग्रहारी व आदित्य अग्रहारी या दोघांचाही बुडून  मृत्यू झाला. काही वेळाने नागरिकांच्या साहाय्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या घटनेची माहिती घाटंजी पोलिस ठाण्याला कळाल्यावर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी  घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दोघांनाही  डॉक्‍टरांनी मृत घोषित केले व सुभाष सायरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जाणून घ्या  : प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण?
 

दोन्ही मृतदेहांचे  शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक  दिनेशचंद्र शुक्‍ला हे आपल्या कर्मचाऱ्यासोबत हजर होते. ही घटना वाऱ्यासारखी शहरात  पसरली. त्यामुळे नागरिकांनी खूप गर्दी केली होती. एकाच वेळेस वडील व मुलाचा असा  अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bapleka dies on Father's Day