esakal | "झुंड'साठी बारसेंचे मुंबईत शूटिंग
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. विजय बारसे

"झुंड'साठी बारसेंचे मुंबईत शूटिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : झोपडपट्‌टीतील गोरगरीब फुटबॉलपटूंना देशविदेशात नवी ओळख निर्माण करून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित "झुंड' या हिंदी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, शेवटचा "क्‍लायमॅक्‍स सीन' या चित्रपटाचे मुख्य नायक प्रा. बारसे यांच्यावर नुकताच मुंबईत शूट करण्यात आला. यात प्रा. बारसे हे सहपरिवार सहभागी झाले होते.
"सैराट फेम' नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि भूषणकुमार व सविता राज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रा. बारसे यांची भूमिका केलेली आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या या चित्रपटाचे सध्या "एडिटिंग' व "डबिंग' सुरू असून, येत्या नोव्हेंबरमध्ये "प्रोमो' लॉंच झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात चित्रपट रिलीज होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, "क्‍लायमॅक्‍स सीन' 29 ऑगस्टला मुंबईच्या अंधेरी पश्‍चिम भागातील वर्सोवा जुहू बीचवर शूट करण्यात आला. यात विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी स्टेजवर डमी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्लम सॉकरचे चायनीज प्रशिक्षक आणि प्रा. बारसे व संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात येतो. या दृश्‍यात क्रीडा विकास संस्थेचे प्रमुख असलेले प्रा. बारसे यांच्या पत्नी प्रा. रंजना, मुलगा ऍड. अभिजित हेही सहभागी झाले होते. यावेळी स्वत: बिग बी व चित्रपटातील काही कलावंत प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. शूटिंग दुपारी बारापासून सायंकाळी पाचपर्यंत चालले. त्यानंतर लगेच 30 व 31 ऑगस्टला संघ विदेशात रवाना होण्यापूर्वीचे विमानतळावरील दृश्‍य चित्रित करण्यात आले.

loading image
go to top