लिफ्ट घेताय? सावधान, गडचिरोलीत घडले असे... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

कोंढाळा येथील 20 वर्षीय पीडित तरुणी ही गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत वाहनाच्या प्रतिक्षेत बसस्थानकावर थांबली होती. बराच वेळ थांबूनही काहीच साधन मिळाले नाही. दरम्यान, रात्री अकरा वाजताच्या सुमारास तिला तिच्या गावातील एक युवक मोटरसायकलने गावाकडे जात असल्याचे दिसले. तिने त्याला थांबवून गावापर्यंत लिफ्ट देण्याची विनंती.

गडचिरोली : महिलांच्या सुरक्षिततेवरून देशभरात रान उठले आहे. दररोज नवनव्या घटना कानावर पडत आहेत. या घटनांच्या निमित्ताने देशातील महिला असुरक्षित असल्याचे अधोरेखित होते. यावर लगाम घालण्यासाठी सरकारने तातडीने उपायोजना करणे आवश्‍यक आहेत. मात्र, महिलांनी देखील प्रत्येक वेळी जागरूक राहणे असेण गरजेचे झाले आहे. नुकताच गडचिरोली जिल्ह्यात एक घटना उघडकीस आली. रात्रीच्या सुमारास लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका युवतीला दुचाकीवर बसविले आणि पुढे जे झाले, ते इतर महिलांनी धडा घेण्यासारखे आहे. 

देसाईगंज तालुक्‍यातील कोढाळा येथील प्रकार 
कोंढाळा येथील 20 वर्षीय पीडित तरुणी ही गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत वाहनाच्या प्रतिक्षेत बसस्थानकावर थांबली होती. बराच वेळ थांबूनही काहीच साधन मिळाले नाही. दरम्यान, रात्री अकरा वाजताच्या सुमारास तिला तिच्या गावातील एक युवक मोटरसायकलने गावाकडे जात असल्याचे दिसले. तिने त्याला थांबवून गावापर्यंत लिफ्ट देण्याची विनंती. मात्र, काही अंतरावर गेल्यावर त्याने आपली मोटर सायकल जंगलाच्या दिशेने वळवली. तरुणीला संशय आला. मात्र, अंधाराचा व एकटेपणाचा फायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला. 

सविस्तर वाचा - पतीने कवटाळले मृत्यूला; "छोटीसी लव्हस्टोरी'चा थरारक अंत

बसथांब्यावर वाहनाच्या प्रतीक्षेत होती युवती 
तिने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून जवळच असलेली राइसमिल गाठली. तेथील लोकांना आपल्यावर घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर उपस्थितांनी भ्रमणध्वनीद्वारे देसाईगंज पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या. युवकांवर गुन्हा दाखल केला असून तरुणाचा पोलिस शोध सुरू आहेत. पीडित तरुणीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

असे का घडले? - दोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता, अखेर सापडला मृतदेह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: be carefull while asking for lift