प्रेमही झालं ‘अनलॉक’; प्रेमविरांची ऑफलाइन भेटीगाठींना सुरुवात

प्रेमही झालं ‘अनलॉक’; प्रेमविरांची ऑफलाइन भेटीगाठींना सुरुवात

मांजरखेड (जि. अमरावती) : प्रेमाला उपमा नाही... प्रेम म्हणजे प्रेम असते, असे कितीतरी प्रेमाचे ‘व्हेरीअंट’ आपण यापूर्वी प्रेम कथेतून व प्रत्यक्षात अनुभवले आहे. मिशन बिगेन अंतर्गत प्रेमविरांनी ‘ब्रेक द चेन’ तोडून ‘दो गज दूरी’चा नियमभंग केला आहे. कोरोनामुळे फॅमिलीच्या फॅमिली सेल्फ आयसोलेटेड झाल्या, शिवाय बाहेर पोलिसरूपी कोरोना वॉरिअर्स असल्याने पालक सुद्धा बिनधास्त झाले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ‘होम क्वारंटाईन’ असलेले प्रेम पुन्हा ‘अनलॉक’ (Unlock) झाल्याने प्रेमविरांमुळे बाग बगीचे (Lovers on the street), पर्यटन प्रकल्प व जंगलातील रस्त्यांना उधाण आल्याने निसर्गातसुद्धा नैऋत्य मोसमी वारे वाहत असल्याचा फील येत आहे. (Beginning-of-offline-dating-of-lovers)

राज्यात फेब्रुवारी-मार्चपासून कोरोनाची सेकंड लाट आल्याने अनेक जिल्ह्याच्या बॉर्डर लॉक करण्यात आल्या. पहिल्या लॉकडाऊन प्रमाणे कलम १४४ लागू केल्याने पोलिसरूपी वॉरिअर्सनी रौद्ररूप धारण केले. पहिल्या लॉकडाऊननंतर शाळा, महाविद्यालये व इतर बाबी अनलॉक झाल्याने दरम्यान फ्रेंड्सच्या भेटीगाठी झाल्या, परत पुन्हा दुसरी लाट आली.

प्रेमही झालं ‘अनलॉक’; प्रेमविरांची ऑफलाइन भेटीगाठींना सुरुवात
शेतकऱ्यांनो, थांबा... थांबा... आठवडाभर तरी जोरदार पाऊस नाहीच!

विशेषतः ही लाट परिवारातील सर्वांना घातक असल्याने सामाजिक अंतर ठेवणे, मास्क लावणे, स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. सर्वत्र ‘वर्क फ्रॉम होम’चे कल्चर आल्याने कोणी लॅपटॉपवर तर कोणी मोबाईलवर दिवसभर ऑनलाइनमध्ये बिझी होते. या व्यस्ततेतून अनेकांची ऑनलाइन ओळखीचे रूपांतर प्रथम मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. सद्यःस्थितीत अनेक तरुणांचे लसीकरण अत्यल्प झाले आहे. अनलॉकमुळे ट्यूशन क्लास, नोट्सच्या बहाण्याने तरुणाई शहराबाहेरील गार्डन, जंगल, तलाव तसेच पर्यटनस्थळांवर पावसाच्या सरीमध्ये तल्लीन झाली आहे. मात्र, लसीकरणा अभावी तरुणाईमध्ये ‘एंटीबॉडी बिल्डअप’ होणे बाकी आहे.

एसएमएस महत्त्वाचा

कोरोना काळात अनलॉक झाल्याने उगाच पालकांचा विश्वासाचा गैरफायदा न घेता गरजेशिवाय बाहेर पडू नये. तरुणाई जिथे एकत्र येत आहे तिथे कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ होऊ नये, यासाठी एस (सॅनेटायझर), एम (मास्क) व एस (सोशल डिस्टन्सिंग)चा अवलंब करणे गरजेचे आहे.

(Beginning-of-offline-dating-of-lovers)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com