संत्रानगरी "बेस्ट सस्टेनेबल ऍण्ड लिव्हेबल'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर यांनाही मार्केनॉमी इन्फ्रा लिडरशिप अर्बन म्युन्सिपल इन्फ्रा ऍण्ड स्मार्ट सिटी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शहराच्या शाश्‍वत विकासासाठी तसेच स्वच्छ, सुंदर व हिरवे नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्‍चर उभारणीसाठीही प्रशासनातर्फे विविध कार्य करण्यात आली आहेत. त्यांच्या कार्याला या पुरस्कारामुळे सन्मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात शहरात चौफेर विकास सुरू आहे. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात आणि दूरदृष्टीतून मनपाने आर्थिक बळकटीसाठी विविध प्रकल्पही विकसित केले. या सर्व संकल्पना, उपक्रमांची योग्य अंमलबजावणी करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या कार्याचा हा सन्मान आहे, अशा शब्दांमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाची प्रशंसा केली. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दोन्ही पुरस्कारांचा स्वीकार केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Best Sustainable and Livable"