
धाबा (जि. चंद्रपूर) : जनावरांना चराईसाठी वनक्षेत्रात घेऊन गेलेल्या गुराख्याला जनावरे वनक्षेत्रात दिसता कामा नये, असा दम वनरक्षकाने दिला. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी भरपावसात वनकार्यालय गाठले. कार्यालयात लिपिक वगळता कुणीच नव्हते. भ्रमणध्वनीव्दारे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे गावकऱ्यांनी समस्या मांडली. हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडला.
मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथील गुराखी विठ्ठल फुलमारे, रामभाऊ राऊत हे मंगळवारी जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेले. वनरक्षक धनराज रायपुरे यांनी जनावरांना वनक्षेत्रात का आणले. परत जनावरे दिसलीत तर कार्यवाही करू अशी दमदाटी गुराख्यांना केली. गुराख्यांनी घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी बुधवारी भरपावसात धाबा येथील वनकार्यालय गाठले. कार्यालयात लिपिक वगळता कुणीच नव्हते. त्यामुळे
भ्रमणध्वनीद्वारे वनपरिक्षेत्राधिकारी राऊतकर यांच्याशी गावकऱ्यांनी चर्चा केली. रोपवनक्षेत्रात गुराढोरांना चराईसाठी नेऊ नका, इतरत्र चराईसाठी मनाई नसल्याचे राऊतकर यांनी सांगितले. दुसऱ्यांच्या चुकीचे खापर डोंगरगाववर फोडल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.