

Rescue teams search a canal in Korambhi village, Bhandara district, after a couple reportedly fell into deep water amid a strong current.
esakal
पवनी: शेतातून घरी परतताना पायावरील चिखल धुण्यासाठी कालव्याच्या पायऱ्यांवर उतरलेल्या पत्नीचा अचानक पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी पतीनेही कालव्यात उडी घेतली; मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहामुळे दोघेही बुडाले. ही घटना तालुक्यातील कोरंभी येथे रविवारी (ता. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.