भंडारा-गोंदियात मतमोजणीला सुरुवात; पटेल, मेंढेंसह पटोलेंची प्रतिष्ठा पणाला

Bhandara Gondia ZP Election
Bhandara Gondia ZP Electione sakal

नागपूर : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel), कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी मंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांवर कोणाचं वर्चस्व असेल? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.(Bhandara Gondia ZP election result)

Bhandara Gondia ZP Election
नाना पटोले तोंडघशी! 'तो' दावा भंडारा पोलिसांनी काढला खोडून

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने सदस्यत्व रद्द झालेल्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली. भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी ६७ उमेदवार तर पंचायत समितीच्या २५ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात होते. गोंदिया जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ३० उमेदवार, तर पंचायत समिती २० जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सरासरी ७३ टक्के मतदान झाले आहे. आज या निवडणुकीचा निकाल आहे. सध्या मतमोजणी सुरू झाली आहे. (Bhandara Gondia ZP election result)

राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात पाय रोवायचे असल्याने प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांच्या पत्नी वर्षाबेन पटेल, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मंत्री छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासह उत्कृष्ठ वक्ते आमदार अमोल मिटकरी यांनाही प्रचारात उतरविले होते. दुसरीकडे नाना पटोले यांना विजयाचा आत्मविश्‍वास असल्याने ते स्वतः आणि विश्‍वजित कदम यांच्याव्यतिरिक्त कॉंग्रेसचे इतर नेते इकडे दिसले नाहीत. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू असे नाना पटोले यांनी म्हटलेले आहे. शिवसेनेने या निवडणुकीत दोनच जागा लढवल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com