Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात
Paddy Crop Damage: भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापणी केलेले आणि उभे पीक पाण्याखाली; शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट, पंचनाम्याची मागणी वाढली.
भंडारा: जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्साहावर पाणी फिरले असून शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.