
या घटनेमुळे माझ्यावर मोठा आघात झाला असून, माझ्या मुलाचा जीव वाचल्यामुळे मनोमन सुखावलो आहे. तरीही आगीच्या कचाट्यात ज्या बालकांचे प्राण गेले त्याचे दुःख आणि सल मनात आहे.
भंडारा : चार दिवसांचा मुलगा आहे. आग लागलेल्या वॉर्डच्या बाजूच्या वॉर्डात भरती होता. आग लागल्यानंतर नातेवाईक आणि पती अजय यांनी धावपळ करीत मुलाला व पत्नीला वॉर्डातून सुखरूप बाहेर काढले. या धावपळीत अजय दोनदा खाली पडले. त्यामुळे त्यांच्या पायाला आणि हाताला जखमा झाल्या. पहिलाच मुलगा झाल्यामुळे आनंदात होतो.
मात्र, बच्चू असलेल्या वॉर्ड जवळून अचानक धूर निघायला लागल्यामुळे मनात काहूर उठलं. जीव कासावीस झाला. लगेच सुरक्षारक्षकाचा कडा तोडून आतमध्ये जाऊन पत्नी व मुलांचा ताबा घेतला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे माझ्यावर मोठा आघात झाला असून, माझ्या मुलाचा जीव वाचल्यामुळे मनोमन सुखावलो आहे. तरीही आगीच्या कचाट्यात ज्या बालकांचे प्राण गेले त्याचे दुःख आणि सल मनात आहे.
भीती काही जात नव्हती
घटनेनंतर मी घाबरून गेले होते. काहीही सूचत नव्हते. पतीला घटनेची माहिती मिळाली आणि धावपळ करीत मुलाला आणि माल बाहेर काढले. आग बाजूच्या वॉर्डात लागली असली तरी भीती काही जात नव्हती. ज्यांच्या बाळांचा मृत्यू झाला. त्यांच्यादुखात सहभागी आहे.
- स्वाती अजय भोयर
रा. चारगाव, ता. तुमसर, जि. भंडारा
संपादन - नीलेश डाखोरे