Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार
60-Year Marriage Ends on the Same Day : भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे ८७ वर्षीय व्यंकटराव खोब्रागडे यांच्या निधनानंतर अवघ्या एका तासात त्यांच्या ७८ वर्षीय पत्नी इंदिरा खोब्रागडे यांचेही निधन झाले.
भंडारा : जन्मोजन्मीची साथ देऊ, सुख-दुःखात एकमेकांना कधीच सोडणार नाही, अशी शपथ घेऊन संसाराच्या वाटेवर एकत्र असलेले दोन जीव शेवटच्या प्रवासातही एकमेकांना सोडून गेली नाहीत. मृत्यूही त्यांची साथ तोडू शकला नाही.