Tiger Attack: वाघाने चिमुरड्याला जबड्यात पकडून नेले, बहीण वाचली, पाळण्यातला भाऊ दगावला; भंडाऱ्याच्या तिर्रीची घटना

Bhandara Tiger Attack : भंडाऱ्याच्या तिर्री गावात घरात शिरलेल्या पट्टेदार वाघाने पाळण्यातल्या सहा महिन्यांच्या बालकाला जबड्यात पकडून नेले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने बालकाचा मृत्यू झाला.
A forest department team at the site after a tiger entered a house in Tirri village, Bhandara district.

A forest department team at the site after a tiger entered a house in Tirri village, Bhandara district.

esakal

Updated on: 

पवनी : घरात शिरलेल्या पट्टेदार वाघाने सहा महिन्यांच्या चिमुरड्यावर झडप घालून त्याला जबड्यात पकडून नेले. वाघाच्या दातांनी गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने चिमुरड्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अड्याळ वनपरिक्षेत्रातील तिर्री येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

Loading content, please wait...