तुमसर - येथील मुख्य चौकातून दररोज विना नंबरची ३० ते ४० वाहने दिवस-रात्र धावत आहेत. यात प्रामुख्याने हायवा, ट्रॅक्टरचा समावेश आहे. अशा वाहनाने चौकातील वाहतुकीला त्रास तर होत आहेच, परंतु अपघात झाल्यास जबाबदार कोण, परिवहन कार्यालय, महसूल विभाग, पोलिस प्रशासन याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.