Bhandara : रानभाजीला आधुनिकतेची जोड देत घेतले लाखोंचे उत्पादन

रान भाजी म्हणून ओळख असलेल्या काटवल पिकाची सलग लागवड करण्याचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग
Bhandara
Bhandara sakal

लाखनी : धान पिकाला पर्याय म्हणून सध्या अनेक शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळत असताना रान भाजी म्हणून ओळख असलेल्या काटवल पिकाची सलग लागवड करण्याचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग सचिन धरमशहारे यांनी यशस्वी करत लाखोंचे उत्पादन घेतले आहे.

लाखनी तालुक्यातील खेडेपार या लहानशा गावात राहणारे सचिन धरमसारे यांनी पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात सर्वप्रथम काटवल या रानभाजीची सलग पद्धतीने अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करत लागवडीला सुरुवात केली .दरवर्षी प्रमाणे या वर्षी एक ऐकर जागेत ठिंबक व मलचींग चा उपयोग करत जून महिन्यात लागवड केली.त्यांनी आतापर्यंत पंधराशे किलो काटवल चे उत्पादन घेतले पुढे आणखी एक महिना या लागवडीचे उत्पादन किमान ५००-७०० किलो मिळणार आहे.या वर्षी प्रती किलो सरासरी दर हे १५० असून तीस हजार लागवड खर्च वजा करत तीन महिन्यांमध्ये दिड लाखांचे उत्पन्न या हंगामात घेतले आहे.

रानभाज्या ची बाजारात नेहमीच चांगली मागणी असते मात्र अनेक दा त्या उपलब्ध होत नाही. परंतु यांचा अभ्यास पूर्ण लागवड केल्यास शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा घेता येतो हे सचिन धरमसारे यांनी दाखवून दिले आहे.जिल्ह्यातील प्रथम लागवड म्हणून मागील वर्षी जिल्हाधिकारी संदीप कदम व उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी भेट देत पाहणी केली होती तसेच परिसरातील अनेक शेतकरी आता काटवल लागवडीकडे वळत असून याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे.रान भाज्या खाण्यासाठी प्रोत्साहित केले.

आपण आपल्या शेतात पिकावत असलेले काटवल ग्राहकांनी घ्यावा व आपल्या उत्पादित मालाची विक्री व्हावी तसेच नागरिकांनी पोष्टिक भाज्या खाव्यात या उद्देशातून तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय,शाळा,शेतकरी मेळाव्यात जाऊन काटवल खाण्याचे फायदे हे नागरिकांना पटवून दिले या साठी फायदे सांगणारे फलक तयार करून ते स्वतः वाटले.

पीक उत्पादनासह बिज निर्मिती.

काटवल या रानभाजीच्य बिजांची लागवड केल्यास उत्पादन घेता येतो हे अनेकांना माहिती नाही.मात्र या रानभाजीची बाजार चांगली मागणी असल्याने सचिन धरम सारे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रथम लागवड केली व त्या पासून चांगल्या प्रतीचे बियाणे तयार करत ते शेतकऱ्यांना विक्री केले आहे.यामुळे बीज विक्रितूनही आर्थिक फायदा घेतला आहे.

सचिन यांनी जिल्ह्यात प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काटवल या रान भाजी ची लागवड केली आहे.त्याचा त्यांना चांगला आर्थिक फायदाही झालं आहे.शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग करावेत त्यासाठी गरज भासल्यास कृषी विभागाची मदत घ्यावी.

किशोर पात्रीकर . तालुका कृषी अधिकारी लाखनी.

पहिल्या वर्षी लागवड केली त्यावेळी अनेक शेतकरी मला हसायचे की रानभाजी अशी शेतावर होणार नाही म्हणून मात्र लागवड झाल्यावर मिळालेले उत्पन्न बघितल्यावर त्याच शेतकऱ्यांनी मा झाकडून बीज विकत घेत लागवडीला सुरुवात केली.या पिकात संशोधन करण्याची गरज असून मादी बिजाची उपलब्धता झाल्यास अधिक फायदा मिळणार आहे.

सचिन धरमसारे. प्रगतशील शेतकरी खेडेपार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com