

Storm Havoc in Bhiwapur: Houses Damaged and Trees Uprooted Due to Heavy Winds
Sakal
भिवापूर : मंगळवारी (ता.५) अचानक आलेल्या भीषण वादळ आणि पावसाने भिवापूर शहरासह परिसरात मोठे नुकसान झाले. महात्मा फुलेनगर भागात वादळाचा सर्वाधिक फटका बसून पतीराम टेकाम आणि मोतीराम इवनाते यांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पत्रे दूरवर फेकली गेली. त्यामुळे घरांच्या भिंती उघड्या पडून घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र अन्नधान्य व घरगुती वस्तूंची हानी झाली.