

Yavatmal News
esakal
यवतमाळ: शहरालगतच्या भोसा रोडवरील व्यंकटेश नगरातील शरीफुद्दीन काझी शमशुद्दीन काझी या व्यक्तीच्या घरात चक्क सात सिलिंडर आढळून आले. ही कारवाई सोमवारी (ता. १३) तहसील आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. ‘त्या’ व्यक्तीने सी.बी. मोर गॅस एजन्सी यांचे बिझनेस डेव्हलपमेंट एरिया असल्याचा दावा केला. परंतु, एजन्सीने सिलिंडर देणे बंद असल्याचे अधिकार्!यांना सांगितले. सातही सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. परंतु, अनधिकृत सिलिंडर बाळगणार्!या ‘त्या’ व्यक्तीवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे.