सायकल यात्रेतून ते सांगताहेत, बापूंचे विचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती जगभर साजरी केली जाणार आहे. यंदा राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वर्ण जयंती वर्षही आहे. या निमित्ताने बनारस हिंदू विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूने बनारस ते सेवाग्राम (वर्धा) पर्यंत सायकल यात्रा काढली आहे. या यात्रेतून ते बापूंचा विचार भारतीयांना सांगत आहे. गुरुवारी (ता. 5) 15 स्वयंसेवक विद्यार्थी व 2 प्राध्यापकांची चमू नागपुरात दाखल झाली. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके यांनी स्वागत केले.

बनारस विद्यापीठाची चमू 23 ऑगस्ट रोजी प्रवासाला निघाली. यात मिर्झापूर, रिवा, सतना, कटनी, जबलपूर, सिवनी, नागपूरनंतर शनिवारी (ता. 7) सप्टेंबर रोजी सेवाग्राम आश्रम येथे दाखल होणार आहे. सेवाग्राम येथे पोहोचल्यानंतर 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय संमेलनात सहभागी होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी महात्मा गांधींना पुणे येथील कारागृहातून सात दिवसाच्या उपोषणानंतर सोडले होते. त्या ऐतिहासिकदिनाचे महत्त्व साधून सायकल यात्रा काढण्यात आली. महात्मा गांधी यांचे जीवन दर्शन व विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेदरम्यान मार्गावरील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, ऐतिहासिक स्थळांना भेटी देत महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, शांती, राष्ट्रीय एकात्मता, सामुदायिक विकास, पर्यावरण, जल संवर्धन आदी विषयांवर संवाद साधत व पथनाट्याच्या माध्यमातून गांधी विचारावर प्रकाश टाकत आहेत. यात्रेचे नेतृत्व विद्यापीठाचे एनएसएस कार्यक्रम समन्वयक डॉ. बाल लखेंद्र करीत असून आर्य महिला पी. जी. कॉलेजचे डॉ. मनीष तिवारी, बलवंत, राजन कुमार, विनायक झा, श्‍याम बदन कुमार, अभिषेक कुमार, दिव्य प्रकाश पाठक, रोहित कुमार कनौजिया, राहुल कुमार यादव, अनीश कुमार, नयन आनंद, नितीश कुमार सुमन, निखिल प्रताप सिंह, हिमांशू यादव, सुभाष सिंह, सुजित कुमार यादव आदी सहभागी झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Bicycle Yatra, he is saying, Bapu's thoughts