Video : कोरोनाच्या लढ्यात बिग बाँसचा सहभाग, चाहत्यांना देतो निरनिराळे टास्क

भूषण काळे
Wednesday, 6 May 2020

मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरेने आपल्या फॅन्सचे चांगलेच मनोरंजन केले आहे. निरनिराळे टास्क देऊन ते पूर्ण करण्याचे चॅलेंज शिवने आपल्या फॅन्सला दिलेत. आणि समस्त  चाहत्यांनीदेखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

अमरावती : लॉकडाउनमध्ये नेमकं काय करावं. दिवस लवकर जात नाही. रात्री झोप येत नाही, अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. मात्र पहिले 21 दिवसांचे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरेने आपल्या फॅन्सचे चांगलेच मनोरंजन केले आहे. निरनिराळे टास्क देऊन ते पूर्ण करण्याचे चॅलेंज शिवने आपल्या फॅन्सला दिलेत. आणि समस्त शिवच्या चाहत्यांनीदेखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
तिसऱ्या लॉकडाउन मध्ये "टॅलेंट चेन विथ शिव ठाकरे'ला सुरुवात झाली आहे. चांगले व्हिडिओ आल्याने त्यातील 11 जणांची निवड करण्यात आली. हे 11 जण प्रत्येकी दोन जणांना त्यांचे टॅलेंट दाखविण्यास सांगतील. या चेनमध्ये आतापर्यंत 80 ते 90 लोक जुळले आहेत. 17 मे पर्यंत हे चॅलेंज चालणार आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

पहिल्या लॉकडाउनच्या सत्रात शिवने आपल्या चाहत्यांसाठी 21 डेज चॅलेंज विथ शिव ठाकरे आणि लॉकडाउन विथ शिव ठाकरे असे दोन हॅश टॅग आपल्या इन्स्टा पेजवर चालविले. या दोन्ही उपक्रमांना त्याच्या चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या अनोख्या उपक्रमात शिवने आपल्या चाहत्यांना निरनिराळे टास्क करण्यास सांगितले. विशेष म्हणजे, चाहत्यांकडून आलेल्या निवडक टास्कचे व्हिडिओ शिव आपल्या इन्स्टा पेजवर शेअर करीत होता. त्यामुळे त्याच्या फॅन्सकडून प्रतिसाद मिळायला लागला. या टास्कमध्ये आई-वडिलांचे नृत्य, चंफुल यासारखे घरातील जुने पारंपरिक खेळ, आजी-आजोबांसोबतच्या गोष्टी असे निरनिराळे टास्क शिव प्रत्येक दिवशी आपल्या चाहत्यांना द्यायचा. विशेष म्हणजे, त्याचे चाहतेदेखील आज नवीन काय याच्या प्रतीक्षेत त्याची लाइव्ह येण्याची प्रतीक्षा करीत राहायचे. यानंतर दुसऱ्या लॉकडाउनच्या सत्रात शिवने माय टॅलेंन्ट विथ शिव ठाकरे हा उपक्रम राबविला. यामध्ये नागरिकांना आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. यामुळे अनेकांनी पेंटिंग, तबलावादन, पेटी वादन आदींचे व्हिडिओ शिवकडे पाठविले. आपल्या चाहत्यांनाही नाराज न करता शिवने त्यातील निवडक व्हिडिओ आपल्या इन्स्टा पेजवर अपलोड करून चाहत्यांना आश्‍चर्याचा व आनंदाचा धक्का दिला.  यासाठी शिवने चाहत्यांना 3 दिवसांचा कालावधी दिला. सध्या 17 मे पर्यंत तिसरे लॉकडाउन जाहीर झाले आहे. या लॉकडाउनमध्येही शिवने एक वेगळेच चॅलेंज आपल्या फॅन्सला दिले आहे.

सविस्तर वाचा - दुकान उघडताच नागरिकांनी लावल्या रांगा, चाळीस दिवसांनंतर मिळाली संधी
 व्हिडिओ व्हायरल
कोरोना जनजागृतीसंदर्भात यापूर्वी शिवने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शविली. यासोबतच कित्येकदा सांगूनही नागरिक ऐकत नसल्याच्या त्याच्या व्हिडिओला तर रसिकांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतले. कोरोना लढ्यात आपलाही सहभाग राहावा, या निमित्ताने ही धडपड करीत असल्याचे शिव ठाकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big boss Shiv Thakare gives tasks to his fans