साहेब, तेल अन्‌ तिखट-मीठ देता का? हातावर पोट असणाऱ्यांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. गेल्या 10-12 दिवसांपासून सर्वच प्रकारची कामे बंद आहेत. सरकारने तीन महिन्यांचे धान्य दिले, मात्र निव्वळ धान्याने पोट भरायचे कसे, असा प्रश्न आहे. पोटासाठी परराज्यात गेलेल्या नागरिकांना शेकडो किमीची पायपीट करावी लागत आहे. काही दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अन्न, पाणी देऊन माणूसकीची बूज राखली.

रामटेक : अजी धान्य तर भेटलं. तेल, तिखट, मीठ देता का, लेकराले नुसता भातच खाऊ घालू का? आमच्याजवळ पैसा नाही, अशी व्यथा एका वृद्ध महिलेने आमदार आशिष जैस्वाल यांच्या कार्यालयात बोलून दाखवली. कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीमुळे जणु काळच थांबला आहे. आर्थिक स्थिती बरी असणाऱ्यांचे आणि गाठीशी काही पैसा असलेल्यांचे बरे भागते आहे. नोकरदारांना तर कामावर गेले नाही तरी पगार मिळणारच आहे. मात्र हातावर पोट घेऊन रोजंदारीवर रात्री चूल पेटवणाऱ्यांचे मात्र खून हाल होताहेत. सरकारने धान्य पुरवण्याची सोय केली आहे. मात्र प्रश्‍न आहे तो तेल-मीठाचा. कोरडी पूाळी किंवा कोरडा भात घशाखाली कसा ढकलणार? असा प्रश्‍न या गरीबांसमोर उभा राहिला आहे आणि ते आपली कैफियत घेऊन नेतेमंडळींचे उंबरठे झिजवत आहेत.
आमदार आशिष जैस्वालांकडे आलेल्या त्या वृद्ध महिलेला काय सांगावे, कुणालाही सूचत नव्हते. त्या महिलेला बॅंक खात्याबाबत विचारले असता, तिने जनधन खाते नसल्याचे सांगितले. तिचे नाव, पत्ता लिहून घरी पाठविले. आमदार आशिष जयस्वाल यांच्या घरीच असलेल्या त्यांच्या कार्यालयात असे अनेक जण येताहेत. अशा नागरिकांना काहीतरी मदत करण्याचे ठरविण्यात आले.
संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. गेल्या 10-12 दिवसांपासून सर्वच प्रकारची कामे बंद आहेत. सरकारने तीन महिन्यांचे धान्य दिले, मात्र निव्वळ धान्याने पोट भरायचे कसे, असा प्रश्न आहे. पोटासाठी परराज्यात गेलेल्या नागरिकांना शेकडो किमीची पायपीट करावी लागत आहे. काही दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अन्न, पाणी देऊन माणूसकीची बूज राखली.

सविस्तर वाचा - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणतो मला बळजबरीने पकडून ठेवले आहे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ व्हायरल
नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनी त्यांच्याकडे येणाऱ्यांना काही साहित्य दिले. आमदार आशिष जयस्वाल यांचे कार्यकर्तेही आमदारांकडे अशी व्यथा घेऊन येणाऱ्यांप्रती काही निर्णयाप्रत आल्याचे समजते. येत्या एक-दोन दिवसात या कार्यकर्त्यांकडून अशा लोकांसाठी पावले उचलली जातील.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big question of hungry infront of beggarly people due to corona