
रामटेक : आमडी परिसरात पुन्हा एकदा अपघाताने थरकाप उडाला आहे. बुधवारी (ता.३०)सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील ग्रामपंचायत नयाकुंड येथील रहिवासी रमेश सुखदेव बिराताल (वय ५०) यांना मध्य प्रदेशातील बालाघाटकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्स वाहनाने अक्षरशः चिरडले. या धडकेनंतर अपघातस्थळी अंगावर शहारे आणणारे दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला.