esakal | याला योगायोगच म्हणाल ना? वडिलांसह दोन मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी
sakal

बोलून बातमी शोधा

याला योगायोगच म्हणाल ना? वडिलांसह दोन मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी

याला योगायोगच म्हणाल ना? वडिलांसह दोन मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी

sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : ‘योगायोग’ हा शब्द अंधश्रद्धेशी साधर्म्य दर्शविणारा वाटत असला तरी त्याचा संबंध ‘घटने’शी असतो. त्यामुळे योग घडून आला किंवा ‘योगायोगा’ने घडले असे म्हटले जाते. मात्र, बाप-लेकांच्या वाढदिवसांचाही (Birthday news) योग घडून येणे याला तर संचितच म्हणावे लागेल. अशीच एक घटना येथील जाधव कुटुंबात घडली (All three have birthdays on the same day). वडिलांचा व दोन मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने एकत्रित साजरा करण्यात आला. (Birthday-of-two-children-with-father-on-the-same-day)

शिवाजीनगरात डॉ. नितीन जाधव राहतात. त्यांचा जन्म १९ जून १९८७ रोजी झाला. मोठा मुलगा चेतन याचा जन्म १९ जून २०१७ रोजी झाला. लहान मुलगा भाविक याचा जन्म १९ जून २०१९ ला झाला. या तिघांचाही वाढदिवस १९ जूनच हाच आहे. डॉ. नितीन जाधव या घटनेला योगायोग मानतात.

हेही वाचा: फादर्स डे : बाप न बोलता प्रेम करतो, न सांगता आधार देतो

योगायोगाने तिघांचाही वाढदिवस एकाच दिवशी आल्याने त्याला कौटुंबिक सोहळ्याचे स्वरूप आले. एकाच दिवशी तिघांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरातील प्रमुख चौकात ‘योगायोग’ हीच ‘टॅगलाइन’न देऊन बॅनर्स लावण्यात आले. आर्णीकरांसाठी ही घटना निश्‍चितच कुतूहलाची असली असली तरी जाधव परिवाराला मात्र तो ‘योगायोग’ वाटत आहे.|

डॉक्टर असल्याने माझा अंधश्रद्धेवर विश्‍वास नाही. त्यामुळे मी योगायोग वैगेरे मानत नाही. परंतु, माझा व दोन्ही मुलांचा वाढदिवस एका दिवशी असणे हा ‘योगायोग’च आमच्या कुटुंबात मानला जातो.
- डॉ. नितीन जाधव, शिवाजी नगर, आर्णी

(Birthday-of-two-children-with-father-on-the-same-day)

loading image
go to top