esakal | यवतमाळ : ओबीसी आरक्षणावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने
sakal

बोलून बातमी शोधा

obc

यवतमाळ : ओबीसी आरक्षणावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : ओबीसींचे आरक्षण (obc reservation) रद्द केल्याप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी (ता.26) राज्यभर चक्काजाम आंदोलन करीत महाविकास आघाडी (Mahavikas aghadi government) सरकारचा निषेध केला. दुसरीकडे काँग्रेसने (congress) ओबीसी आरक्षण रद्द केल्याने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण संपविण्यात केंद्र सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसने करीत स्थानिक तहसील चौकात आंदोलन केले. (bjp and congress agitation for obc reservation in yavatmal)

हेही वाचा: ...तर राजकारणातून संन्यास घेईल, फडणवीसांची मोठी घोषणा

काँग्रेस घेणार संविधान रक्षणाची शपथ -

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. भाजपमुळेच ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केला. सामाजिक न्यायदिनी काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. ओबीसी आरक्षण संपविण्यात केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप करीत केंद्र शासनाचा निषेध नोंदविला. संविधान रक्षणाची शपथ घेणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, नगरसेवक जावेद अन्सारी, रवी ढोक, प्रा. बबलू देशमुख, विक्की राऊत, विशाल पावडे, वैशाली सवाई, दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके, संदीप तेलगोटे, अरुण ठाकूर, अजय किन्हीकर, छोटू सवाई, मिलिंद रामटेके, सुकांत वंजारी, घनश्याम अत्रे, स्वप्नील गावंडे, शब्बीर खान, विजय राजुरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचा चक्काजाम -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने भाजप आक्रमक झाली आहे. शनिवारी (ता.26) जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यवतमाळ शहरात स्थानिक बसस्थानक चौकात भाजपतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसींचे आरक्षण कायम करण्यात यावे, या मागणीसाठी भाजपच्या ओबीसी सेलने चक्काजाम आंदोलन केले. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी राज्य सरकारविरोधात नारेबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. बसस्थानक चौकातील मार्ग रोखून पदाधिकार्‍यांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात भाजपचे आमदार मदन येरावार, ओबीसी सेलचे विदर्भप्रमुख राजेंद्र डांगे, प्रशांत यादव, यवतमाळ नगरपालिकेतील गटनेते विजय खडसे, नगरसेवक प्रा. प्रवीण प्रजापती, प्रा. डॉ. अमोल देशमुख, सुजित राय, मनोज मुधोळकर, अजय बिहाडे, सुनील समदुरकर, मोहन देशमुख, सोमेश चौधरी, नगरसेविका संगीता कासार, राजू पडगीलवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे, भाजयुमोचे आकाश धुरट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

loading image
go to top