esakal | भाजपच्या मुलाखती; उत्तर व पश्‍चिमेत सर्वाधिक इच्छुक
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या मुलाखती; उत्तर व पश्‍चिमेत सर्वाधिक इच्छुक

भाजपच्या मुलाखती; उत्तर व पश्‍चिमेत सर्वाधिक इच्छुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : माजी महापौर आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी मध्य नागपूर तर माजी आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरवर दावा केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत.
विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी रविभवन येथे सहा विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. दक्षिण नागपूरमधून मोहन मते यांच्यासह, माजी उपमहापौर व सुधार प्रन्यासचे विश्‍वस्त रवींद्र भोयर, माजी नगरसेवक रमेश सिंगारे, देवेन दस्तुरे, बळवंत जिचकार, आशीष वांदिले, अर्चना डेहनकर, कैलाश चुटे, दीपक चौधरी यांनी प्रामुख्याने मुलाखती दिल्या. येथे सुधाकर कोहळे विद्यमान आमदार आहेत. मध्य नागपूरमध्ये भाजपचेच विकास कुंभारे आमदार आहेत. येथून प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पारडीकर यांनी उमेदवारी मागितली आहे. पश्‍चिमसाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी होती. यात महापौर नंदा जिचकार, दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, भूषण शिंगणे, अश्‍विनी जिचकार, प्रगती पाटील, संगीता गिरे, रमेश चोपडे, दीपक चोप्रा आदींचा समावेश होता. उत्तरमधून तब्बल 16 जणांनी उमेदवारी मागितली. यात विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने, रमेश वानखेडे, संदीप जाधव, सुभाष पारधी, धर्मपाल मेश्राम, पंकज सोनकर, बबली मेश्राम, महेंद्र धनविजय, राजू बावरा, अविनाश धमगाये, संदीप गवई, मधुसूदन गवई, राजू हत्तीठेले, रमेश फुले, विभा ठवरे आणि बंडू पारवे यांचा समावेश होता.
आमदारांची दांडी, बागडेंची नाराजी
निवडणूक लढण्यास सर्व इच्छुकांना मुलखतीला बोलावले होते. मात्र, आमदार मिलिंद माने यांचा अपवादवगळता एकाही आमदाराने मुलाखत दिली नाही. सर्व आमदर कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर ते निघून गेले. 
loading image
go to top