अमरावती दगडफेक प्रकरण : भाजप शिष्टमंडळाला घेतले ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Leaders Detained Amravati Stone Pelting Case

अमरावती दगडफेक प्रकरण : भाजप शिष्टमंडळाला घेतले ताब्यात

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा काढण्याच्या वादातून दोन गटामध्ये तुफान राडा झाला. यामध्ये दगडफेक (Amravati Achalpur Stone Pelting) देखील करण्यात आली. त्यानंतर भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अचलपूर आणि परतवाड्याकडे जाण्याच्या तयारी होते. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: अमरावतीत दोन गटात दगडफेक, कलम १४४ लागू

दगडफेकीची घटना घडल्यानंतर भाजपचे पदाधिकारी अचलपूर आणि परतवाड्याकडे जायला निघाले होते. पण, पोलिसांनी अचलपूर येथे जाण्यापासून त्यांना रोखले. त्यांना ताब्यात घेऊन आसेगाव पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय? -

अचलपूर आणि परतवाडा शहरात तसेच देवमाळी व काढली भागात रविवारी रात्री रस्त्यावर जमाव उतरला होता. झेंडा काढण्यावरून दोन गटात राडा झाला. पोलिसांनी रुट मार्च काढून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. जमाव शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुरांचा वापर केला. त्यानंर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आणखी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आदेश अचलपूर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यालयाच्या पोलिस दलासह अकोला पोलिसांनाही अचलपूर आणि परतवाड्यात तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Bjp Leaders Detained By Police In Amravati Achalpur Stone Pelting Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpAmravati
go to top