साध्वी प्रज्ञासिंगवर भाजपने कारवाई करावी; भाजप आमदाराचीच मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील  आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘करकरेंना दहशतवाद्यांनी जेव्हा मारलं, तेव्हा माझं सुतक संपलं’ असं म्हटलं आहे.

अमरावती : बेताल व बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त होत असताना आता अमरावतीचे भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी या वक्तव्याला निंदाजनक म्हटले असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) साध्वी प्रज्ञा यांच्यावर कारवाई करून देशाच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी फेसबुकवर पोस्ट टाकत केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील  आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘करकरेंना दहशतवाद्यांनी जेव्हा मारलं, तेव्हा माझं सुतक संपलं’ असं म्हटलं आहे. अशा तथाकथित साध्वीला आता, भोपाळमधून नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

Web Title: BJP MLA Sunil Deshmukh demands action against Sadhvi Pradnya