Navneet Rana : नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी
Amravati News : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानमधून 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
अमरावती : अमरावतीच्या माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना ‘सिंदूर’चा उल्लेख करीत नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.