esakal | 'बॅलेट आले तरी भाजपच जिंकेल'
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant-Patil-CM-Devendra-Fadnavis

भाजप-सेना युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. भाजपच्या आमदारांची संख्या सध्या 132 (आलेले धरून) आहे.

'बॅलेट आले तरी भाजपच जिंकेल'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजपची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे "ईव्हीएम'ऐवजी बॅलेट पेपरने निवडणूक घेतली, तरी भाजपच जिंकेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. गडबडच करायची असती, तर बारामतीतसुद्धा केली असती, असे सांगून "ईव्हीएम'विरोधात एकवटलेल्या विरोधकांना त्यांनी या वेळी टोला हाणला. 

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीसाठी पाटील नागपूरला आले होते. ते म्हणाले, "निवडणूक जिंकण्यासाठी बूथपर्यंत तयारी करावी लागते. भाजपने एक कोटी सहा लाख सदस्यनोंदणी केली आहे. त्यानंतर 50 लाखांनी टार्गेट वाढविले. त्यापैकी 32 लाख सदस्यांची नोंदणी झाली. बूथही बांधले गेले आहेत. पेजप्रमुखांच्याही नियुक्‍त्या झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक ईव्हीएम किंवा बॅलेटने घेतली, तरी भाजपला काही फरक पडणार नाही. आम्ही 220 जागा जिंकू.'' 
लोकसभेच्या निवडणुकीतही आपण स्वतः बारामतीत ठाण मांडून बसलो होतो. मात्र, ती जिंकणे शक्‍य झाले नाही. ईव्हीएम मॅनेज करता आले असते, तर बारामतीही जिंकता आली असती, असेही त्यांनी सांगितले. 

'कोहिनूर'साठी पैसा कुठून आला? 
सक्तवसुली संचालनालय एका दिवसात कारवाई करीत नाही. त्याकरिता अनेक वर्षे रेकी केली जाते. उत्पन्नाचे स्रोत तपासले जातात. त्यामुळे सरकारच्या आदेशावरून "ईडी' कारवाई करते, असे म्हणणे हास्यास्पद आहे. जे 20 वर्षांपूर्वी स्कूटरने फिरत होते ते कोट्यधीश कसे झाले? कोट्यवधीची कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

अदलाबदलीची शक्‍यता नाही 
भाजप-सेना युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. भाजपच्या आमदारांची संख्या सध्या 132 (आलेले धरून) आहे. सिटिंग कायम ठेवण्यात येणार असल्याने जागा अदलाबदलाची शक्‍यता फारच कमी आहे. दोघांचा वैचारिक अजेंडा एकच असल्याने युती होणारच आहे. शिवसेनेलाही त्यांच्या जागा आणि क्षमतेची जाणीव असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top