esakal | सोशल मीडियावरील प्रेमप्रकरणातून महिलांना केले जाते ब्लॅकमेल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सोशल मीडियावरील प्रेमप्रकरणातून महिलांना केले जाते ब्लॅकमेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सोशल मीडियावरून जुळलेल्या सुताची पक्की गाठ बांधणे अवघड होत आहे. त्यातून प्रेमप्रकरण व लग्नाच्या आणाभाका घेतल्या जात असल्यामुळे युवती, महिलांना ब्लॅकमेल करण्याचे ते साधन ठरल्याची धक्कादायक माहिती आहे.
शहरातील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या युवतीची ओळख सोशल मीडियावरून (फेसबुक) शहरातील अजय रामदास सोळंके नामक युवकासोबत झाली. फेसबुक चॅटींगनंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. भेटीनंतर अल्पावधीतच त्यांच्यातील प्रेमप्रकरणाला उधाण आले. फेसबुकवरील ओळखीनंतर प्रेमप्रकरण सुरू असल्याची कबुली खुद्द महिलेनेच दिली आहे. परंतु काही दिवसांतच त्यांच्यात कसल्यातरी कारणावरून वाद होऊन दुरावा निर्माण झाला. आपली विवाहित प्रेयसी भेटण्यासाठी टाळत असल्याचे अजयला समजले. त्याने थेट तिचे घर गाठले. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने प्रेयसीच्याच घरी तिला चाकूचा धाक दाखवून तिला सोबत येऊन लग्न कर किंवा लग्न न केल्यास पैसे तरी दे, अशी मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने प्रेयसीच्याच मुलीला मारण्याची धमकी दिली. पीडितेलाही जबर मारहाण करून जखमी केले. अजयकडून ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने गाडगेनगर ठाण्यात तक्रार केली. प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अजय सोळंकेविरुद्ध खंडणी, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला.

loading image
go to top