esakal | तारासावगा बुडाले शोकसागरात; तब्बल 30 तास लोटूनही मृतदेह बेपत्ताच
sakal

बोलून बातमी शोधा

Wardha River

तारासावगा बुडाले शोकसागरात; तब्बल 30 तास लोटूनही मृतदेह बेपत्ताच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आष्टी (शहीद) : नजीकच असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे गाडेगाव येथून दशक्रियाचा कार्यक्रम आटपून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा नाव बुडून मृत्यू झाल्याची घटना घडून तब्बल 30 तास उलटूनदेखील अद्याप आठ मृतदेह शोधण्यात अजून पर्यंत यश न आल्याने तारासावगा येथे नीरव शांतता व गावावर भयान शोककळा पसरली. याचे चित्र सध्या निर्माण झाले असून या स्थितीमुळे गावात चुल देखील पेटली नाही.

काल ता. 14 ला आदल्या दिवशी वरुड तालुक्यातील गादेगाव येथे दशक्रिया चा कार्यक्रम आटपून सर्व नातेवाईक एकत्र असल्यामुळे महिला मंडळींच्या आग्रहास्तव जवळच असलेल्या श्रीक्षेत्र येथील पर्यटन स्थळावर वर्धा नदीचे नैसर्गिक दृश्य पाहण्याकरता आलेल्या संबंध नातेवाईक यांनी आनंदाने याठिकाणी विरंगुळा करत असताना अचानक नावेत बसून पाण्यात फेऱ्या मारण्याचा मोह न आवडल्याने यातील महिला व काही पुरुष नावेत बसून वर्धा नदीच्या भयान पात्रात पर्यटन करीत असताना अचानक नावेला हेलकावे येऊन धबधब्याजवळ अचानक नाव पलटी होऊन नावेतील 11 महिला पुरुष नावेसह बुडाले. मात्र, स्थानिक मासेमारांच्या मदतीने तत्काळ धाव घेतल्याने तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. उर्वरित मृतदेह अद्यापही बेपत्ता असून नावदेखील बेपत्ता आहे. या आठ बेपत्ता मृतदेहांपैकी आष्टी तालुक्यातील तारासावगा येथील 5 व्यक्तींचा समावेश आहे. त्यातील एकाच परिवारातील दोन सख्ख्या बहिणी, कुमारी मोनाली सुखदेव खंडाळे, वय १२ वर्ष, कुमारी आदिती सुखदेव खंडाळे, वय १३ वर्ष, अश्विनी अमर खंडाळे, वय २१ वर्ष, रुशू अतुल वाघमारे, १९ वर्ष, अतुल गणेशराव वाघमारे, वय २५ वर्ष, अशा एकूण पाच लोकांचा समावेश आहे.

काल सकाळी साडे अकरा वाजता पासून बेपत्ता झालेले वरील मृतदेह शोधण्यात प्रशासनाला अद्यापपर्यंत यश आले नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपुर अमरावती वर्धा जिल्ह्यातील प्रशासन मृतदेह शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असून नावे सहा एकूण आठ लोक बेपत्ता असल्याने बेपत्ता यांच्या परिवारात भयानक स्मशान शांतता निर्माण झाली आहे.

मृतदेह शोधण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न व्हावे यासाठी आज घटनास्थळाला राज्यमंत्री नामदार बच्चू कडू, आर्वी येथील आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे, यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रशासकीय स्तरावर मृतदेह शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालविले आहे.

आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे यांनी तारासावगा येथे बेपत्ता असलेल्या मृतकांच्या परिवाराला सांगतो ना भेट देऊन शासन स्तरावर मदतीसाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर दुपारी साडेचारचे दरम्यान वर्धा येथील जिल्हाधिकारी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांनी घटनास्थळाला भेट देऊन तारासावंगा येथील मृतकांच्या परिवाराला भेटी दिल्या.

सध्या केंद्रीय आपत्ती निवारण दल मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी मृतदेहाचा अद्याप पर्यंत पत्ता न लागल्याने नागपुर अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हेलिकॉप्टरद्वारे घटनास्थळाची पाहणी करून ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमाने परिसराचा शोधमोहीम करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.

आम्हाला शासनाने परवानगी दिल्यास आम्ही मृतदेह शोधून काढू

केंद्रीय आपत्ती निवारण दल, व राज्य नैसर्गिक आपत्ती निवारण दलाला अद्याप पर्यंत मृतदेह शोधण्यासाठी यश न आल्याने स्थानिक मासेमार यांनी आम्हाला येथील नदीचा व नेहमी होणाऱ्या दुर्घटना त्यातील मृतदेह शोधण्याचा अनुभव असल्याने आम्हाला प्रशासनाने मृतदेह शोधण्याची परवानगी दिल्यास आम्ही मृतदेह शोधून काढू. असा स्थानिक मासेमार पाणबुडे यांनी शासनाला परवानगी मागितली आहे. मात्र, प्रशासनाने अशी कुठलीही परवानगी अध्यापक दिली नाही.

काल घडलेल्या या दुर्दैवी घटनेत दोन वर्षीय चिमुकली वंशिका ने सोडला आजोबाच्या कुशीत प्राण

जणू काय साथ जियेंगे, साथ मरेंगे! ही शपथ मृतक दोन वर्षीय वंशिका व तिचे आजोबा नारायणराव मटरे यांनी घेतली असावी, असा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग. या नावबुडीत दुर्दैवी घटनेत घडला. कि नाव पलटी झाल्यानंतर प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात शर्थीचे प्रयत्न करीत असताना दोन वर्षीय वंशिका ही आपली नात वाचावी यासाठी आजोबांनी शर्थीचे प्रयत्न करून स्वतःच्या जीवाची परवा न करता नारायणराव मटरे यांनी आपल्या दोन वर्षीय नातीला छातीशी घट्ट पकडून पोहून नदी बाहेर पडण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. मात्र, नदीच्या काठावर पोहोचेपर्यंत तिला कुशीत घेऊनच स्वतःचा प्राण सोडला. यातच नातीने देखिला आजोबाच्या गळ्याला घट्ट मिठी मारली असतानाच प्राण सोडल्याने घटनास्थळावर नदीकाठी आजोबा आणि नातीचा एकमेकाला घट्ट मिठी मारून असलेला मृतदेह काल निदर्शनास आला. हृदयाला पीळ देणारी घटना घडल्याने गावात अध्यापक देखील चुल पेटल्या नाहीत.

loading image
go to top