अर्धनग्न अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
अर्धनग्न अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

अर्धनग्न अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

आमगाव : तालुक्याच्या कुंभारटोली येथील जंगल परिसरात एका अनोळखी युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी (ता. २१) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली आली. मारेकऱ्यांनी सदर युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने हत्या केली असावी, असा अंदाज असून नंतर तिच्याच पायजम्याने तिचा चेहरा जाळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कुंभारटोली येथील काही नागरिक लगतच्या जंगल परिसरातील महादेव पहाडीकडे सरपण वेचण्याकरिता, तर काही जण मार्निंग वाॅककरिता गेले होते. त्यांच्यापैकी काही जणांना चेहरा जळत असलेला युवतीचा मृतदेह दिसला. याबाबतची माहिती त्यांनी आमगाव पोलिसांना दिली. पोलिस उपनिरिक्षक दिलीप कन्नमवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. सदर युवती ही २० ते २१ वर्षे वयोगटातील असून, चेहरा पूर्णतः जळाल्याने तिची ओळख पटू शकली नाही. तिच्या कानाजवळ जखमासुद्धा आहे. मारेकऱ्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचेही घटनास्थळावरून लक्षात येते.

अत्याचारानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली असावी, असा अंदाज असून नंतर तिच्याच पायजम्याने तिचा चेहरा जाळल्याचेही प्रथमदर्शनी दिसून येते. दरम्यान, आमगाव पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असून श्वानपथकालाही पाचारण करण्यात केले आहे. ही तरुणी कुठली आहे. तिची हत्या का करण्यात आली? याचा उलगडा अद्याप झाला नाही. या घटनेने मात्र, परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Body Young Woman Found Half Naked Incidents Kumbhartoli Forest Killers Burned Face

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top