Santosh Mahatme and Ajit Pawar
sakal
विदर्भ
Ajit Pawar : संतोष महात्मे यांनी दिलेला दुपट्टाही शेवटच्या प्रवासात अजितदादांसोबत
संतोष महात्मे हे नेहमी अजितदादांचे स्वागत घोंगडी किंवा दुपट्टा देऊन करायचे. दादांच्या अखेरच्या प्रवासातही महात्मे यांनी दिलेला दुपट्टा दादांसोबत होता.
अमरावती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या साधेपणा व आपुलकीच्या अनेक दाखल्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळणारे बळ अभूतपूर्वच होते. राष्ट्रवादीचे अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे हे नेहमी अजितदादांचे स्वागत घोंगडी किंवा दुपट्टा देऊन करायचे. आज दादांच्या अखेरच्या प्रवासातही महात्मे यांनी दिलेला दुपट्टा दादांसोबत होता.
