अमरावती जिल्ह्यातील 532 गावांना मिळणार बुस्टर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

अमरावती : जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा लाभ आता 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 532 गावांना बुस्टर मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील 4 हजार 210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाणपट्ट्याची 932 गावे अशा एकूण 5 हजार 142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान अनुकूल कृषि प्रकल्प) राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 355 गावे खारपाणपट्ट्यातील असून या गावांतील शेतीक्षेत्र 1.60 लाख 206 हेक्‍टर आहे. हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करून शेतकरी व एकंदर कृषिक्षेत्रास सक्षम करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना यामध्ये करण्यात येत आहेत. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प सुकाणू समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे.
सुधारणांनुसार प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच आता 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांनादेखील विविध बाबींसाठी लाभ दिला जाणार आहे. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तीक लाभाच्या बाबींसाठी अर्थसाहाय्याचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांवरून आता 75 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच 2 ते 5 हेक्‍टरपर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना 65 टक्‍के अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना 60 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत अनुदान दिले जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Booster will get 532 villages in Amravati district