Accident News : बोरवेल मशिनचा ट्रक उलटून कामगार ठार
Worker Safety : कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील खुरसापार शिवारात बोरवेल मशिनचा ट्रक उलटून कामगार ठार झाला. झिरकू बाबुलाल सेलूकर असे मृताचे नाव असून, दोघे जण जखमी झाले.
कळमेश्वर : तालुक्यातील मोहपा जवळील खुरसापार शिवारात बोरवेल मशिनचा ट्रक उलटून एक ठार, दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२२) पहाटे घडली. झिरकू बाबुलाल सेलूकर असे मृताचे नाव आहे.