
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : मागील तीन वर्षांपासून ब्रह्मपुरी शहरात कार्पेट तयार केले जाते. या कार्पेटला इतर राज्यांसह परदेशात मोठी मागणी आहे. हे कार्पेट मशीनवर तयार केले जात नसून, महिला एक एक धागा विणत ते तयार करतात. हाताने विणलेले कार्पेट अधिक आकर्षक दिसत असल्याने बाजारपेठेत मोठी मागणी आहे.